__ तुमचं आमचं कुसु फारमिंग__


     ' कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा ' असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत म्हणजेच कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकर्यापयॆंत पोहोचले असा याचा अर्थ नाही. कसे विकायचे हे सांगणे आवश्यक आहे पण त्याचबरोबर कसे आणि कोठे विकावे या माहितीची गरज वाढत चालली आहे.  अनेक प्रकारचे कष्ट करून शेतकर्याने अतिशय उत्तम प्रतीचा शेतमाल पिकवला आणि त्याला बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकर्या चा हिरमोड होतो, आणि तो तोट्यात जातो हे उघड आहे. शेतमालाच्या बाजाराइतकी अनिश्चितता अन्य उत्पादनांमध्ये नाही, मुळात शेती निसर्गावर अवलंबून आहे. आणि निसर्ग ही आजकाल साथ देइनासा झाला आहे, अन्य उत्पादकांपेक्षा भारतीय शेतकरी हा या व्यवस्थेत भरडला जाणारा अतिशय संवेदनशील असा घटक आहे. 
आजच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमी वर शहरीभागातील लोकांमधे भीती चे वातावरण निर्माण झाले आहे  ,अनेकजण बाहेरून भाजीपाला,फळे  खरेदी करण्यास घाबरत आहेत ,या शहरी भागातील लोकांची अडचण दूर करण्यासाठी आम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांनचंच *कुसु फारमिंग .....*
शेतकर्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळावा,तसेच  स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध ह्वाव्यात ,आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे शेतातून निघालेला स्वच्छ व ताजा  भाजीपाला 24 तासाच्या आत ग्राहकांपयॆत पोहोचावा हिच या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट आहेत.
    ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार घरपोच भाजी देण्यासाठी ,तसेच व्यवस्थित पॅकिंग साठी VEGBOX  ची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे , एका vegbox  मध्ये  सुमारे 5 ते 12 प्रकारच्या भाज्या बसू शकतात. 
कुसु फारमिंग च्या माध्यमातून कुसु ग्रुप हे भाज्या व फळे शेतकर्या च्या बांधावरून थेट ग्राहकांच्या दारात पोहोचणार आहे....
  चला तर मग तुमच्या आमच्या  या छोट्याशा रोपट्याला फुलवण्यासाठी वाटचाल सुरु करू.........

Comments