__ तुमचं आमचं कुसु फारमिंग__
' कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा ' असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत म्हणजेच कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकर्यापयॆंत पोहोचले असा याचा अर्थ नाही. कसे विकायचे हे सांगणे आवश्यक आहे पण त्याचबरोबर कसे आणि कोठे विकावे या माहितीची गरज वाढत चालली आहे. अनेक प्रकारचे कष्ट करून शेतकर्याने अतिशय उत्तम प्रतीचा शेतमाल पिकवला आणि त्याला बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकर्या चा हिरमोड होतो, आणि तो तोट्यात जातो हे उघड आहे. शेतमालाच्या बाजाराइतकी अनिश्चितता अन्य उत्पादनांमध्ये नाही, मुळात शेती निसर्गावर अवलंबून आहे. आणि निसर्ग ही आजकाल साथ देइनासा झाला आहे, अन्य उत्पादकांपेक्षा भारतीय शेतकरी हा या व्यवस्थेत भरडला जाणारा अतिशय संवेदनशील असा घटक आहे. आजच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमी वर शहरीभागातील लोकांमधे भीती चे वातावरण निर्माण झाले आहे ,अनेकजण बाहेरून भाजीपाला,फळे खरेदी करण्यास घाबरत आहेत ,या शहरी भागातील लोकांची अडचण दूर करण्यासाठी आम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांनचंच * कुसु फारमिंग .....* ...